सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

बातमी शेअर करा

सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या हिंद स्वराज्य संघ वतीने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना मंगळवार दि.१२ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा होईल. टिळक स्मारक ट्रस्टचे व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी आजपत्रकार परिषदेत ही माहिती दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशिलकुमार शिंदे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि खासदार रजनी पाटील पुरस्कार वितरण सोहळयास प्रमुख पाहुणेम्हणून उपस्थित राहणार आहेत. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.

टिमवि ट्रस्टच्या टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन यावेळी वांगचुक यांच्याहस्ते होणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यालयाला बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी परवानगी असून सध्या तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. यावेळी टिमविच्या कुलगुरू डॉ.गीताली टिळक-मोने, टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रमुख व टिमवि ट्रस्टच्या विश्वस्त डॉ.प्रणती टिळक उपस्थित असतील.विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा हिरीरीनेपुरस्कार व प्रसार त्याचबरोबर क्षिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगचुक यांनी सन २०२० च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र कोरोनामुळे तेव्हा पुरस्कारवितरण सोहळा होऊ शकला नव्हता.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम