पोटच्या दोन मुलांना पाण्यात फेकून मातेने स्वतःही संपविले जीवन

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | २० नोव्हेंबर २०२२ | एका महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात येथे घडला आहे.
पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. घटना बिरकाली भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय हुसैनाने ५ वर्षांची मुलगी सिमरन आणि १८ महिन्यांचा मुलगा विशाल यांना सर्वप्रथम तलावात टाकले. नंतर संबंधित मुलांच्या आईने देखील तलावात उडी मारून जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रघुवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैना या महिलेचा सात वर्षांपूर्वी विकास खान नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना दोन मुलेही होती. मात्र हुसैना आणि विकास यांच्यात वारंवार वाद होत होते. घरगुती वादातून हुसैनाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम