राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेबाबत धरणगाव तहसिलला निवेदन सादर

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेबाबत धरणगाव तहसिलला निवेदन सादर

बातमी शेअर करा

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेबाबत धरणगाव तहसिलला निवेदन सादर

धरणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ प्रशासनाकडून लावण्यात आलेला अशोकचक्रासह तिरंगा ध्वज मळकट अवस्थेत असून तो ध्वज ध्वजसंहितेच्या नियमावलीनुसार उतरून नव्याने लावण्यात यावा, यासाठी धरणगाव तहसिलचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना आज रोजी निवेदन सादर करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला गेल्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवला गेला. धरणगाव प्रशासनाकडून लावण्यात आलेला १५ ऑगस्ट, २०२२ पासून राष्ट्रीय ध्वज मोठ्या डौलाने फडकत असून सदरील ध्वज उन, वारा, वादळ व पावसात अखंडपणे राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आणि संदेश देत आहे. शहरासह देशवासीयांना प्रेरणा देणारा राष्ट्रध्वज आमचा, तुमचा सर्वांचा मान आणि अभिमान आहे, परंतु कित्येक दिवसापासून फडकत असलेला आपला राष्ट्रध्वज खराब होतोय. मळलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत असलेल्या ध्वज पाहून एक भारतीय म्हणून आम्हा-तुम्हा सर्वांना वेदना होत आहेत.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाच्या वेळी ‘झंडा उँचा रहे हमारा’ असे अभिमानाने आपण म्हणतो आणि राष्ट्रध्वजबद्दल प्रत्येकाची अस्मिता उफाळून येते. नक्कीच प्रत्येकाला अस्मिता असायला पाहिजे परंतु ज्या प्रशासनाने राष्ट्रध्वज लावला आहे त्यांना ध्वजाचा विसर पडला की काय? असा अनुत्तरित प्रश्न निर्माण होत आहे. छ. शिवरायांच्या डोळ्यादेखत मोठ्या डौलाने राष्ट्रभक्तीच्या व राष्ट्रप्रेमाचा संदेश देत फडकत असणाऱ्या राष्ट्रध्वजाचे ध्वजावतरण करून त्याजागी नवीन ध्वजाचे ध्वजारोहण ध्वजसंहितेच्या अधिनियमांचे पालन करून लावण्यात यावे, या आशयाचे निवेदन सागर पाटील, राहुल धनगर, कृष्णा ठाकूर, ज्ञानेश पाटील, उज्वल देवरे, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, आकाश बिवाल, निलेश पवार, गोरख देशमुख, नगर मोमिन, हसन रझा, करीम लाला, लक्ष्मणराव पाटील, राजेंद्र वाघ आदींनी प्रशासकीय अधिकारी तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना सादर केले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम