सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बांधणार लवकरच लग्नगाठ

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २५ डिसेंबर २०२२ I सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी दोघंही प्रेमात आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.
अद्याप अधिकृतपणे दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण आता हे नातं लग्नापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं हे लव्ह बर्ड्स येत्या जानेवारीत लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये.
होय, सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दोघं जणं फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घरी दिसले. शनिवारी रात्री हे जोडपं मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताना स्पॉट झालं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने या दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम