ट्रेंडिंग स्टार’ खेसारी लाल यादव ‘दिल के गलती बा’ गाणे रिलीज

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १ डिसेंबर २०२२ I भोजपुरी इंडस्ट्रीत अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि गायन कौशल्यामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कलाकारांमध्ये ‘ट्रेंडिंग स्टार’ खेसारी लाल यादव याचाही समावेश होतो. आतापर्यंत खेसारीची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. अशात त्याचे आम्रपाली दुबे हिच्यासोबतच्या एका गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये खेसारी लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्रीही चाहत्यांची मने जिंकत आहे.

खेसारी लाल यादव आणि आम्रपाली दुबेयांच्या नवीन गाण्याचे नाव ‘दिल के गलती बा’ असे आहे. हे गाणे ‘डोली सजा के रखना’ सिनेमात चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे एसआरके म्युझिक या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 39 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

या व्हिडिओत दिसते की, खेसारी लाल यादव आम्रपाली दुबे हिच्या प्रेमात असतो, पण तो तिच्यापुढे प्रेम व्यक्त करत नाही. मात्र, तो लपून छपून तिच्यावर प्रेम करतो. त्यांच्यात कमालीची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. आम्रपालीला खेसारीवर प्रेम येते. या गाण्यात दोघांनी गाण्यात कोणताही डान्स केला नाहीये, पण ते कल्पना करत एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत. या गाण्याला आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे, तर लिरिक्स हे विजय चौहान यांनी लिहिले आहेत.

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम