रशियन महिलाही थिरकल्या सामी सामी गाण्यावर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २ डिसेंबर २०२२ I ‘पुष्पा: द राईज‘ या सिनेमाला प्रदर्शित होऊन आता जवळपास 1 वर्षे उलटले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ या सिनेमाला भारतातच नाही, तर परदेशातूनही प्रेम मिळाले. विशेष म्हणजे, या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. आता हा सिनेमा रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच रशियन लोकांवरही ‘पुष्पा’चा फिव्हर चढताना दिसत आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या आहेत.

रशियामध्ये ‘पुष्पा: द राईज’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही रशियन महिला ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत महिला मॉस्कोच्या रेड स्क्वेअर येथील स्टेट हिस्टोरिकल म्युझिअमसमोर थिरकत आहेत. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम