फीफामध्ये लाईव्ह परफॉर्म करतांना नोरासोबत अश्लील कृत्य

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २ डिसेंबर २०२२ I अनेकदा कलाकारांसोबत एखाद्या गर्दीच्या ठिकाणी किंवा लाईव्ह शोदरम्यान छेडछाड केल्याच्या घटना समोर येत असतात. जेव्हा कलाकारांना हे समजते, तेव्हा ते तिथल्या तिथेच पाणउतारा केल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, कधीकधी त्यांचे लक्ष जात नाही, पण चाहत्यांच्या नजरा सगळीकडे असतात. असेच काहीसे आता ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही हिच्यासोबत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नोरा फतेही फीफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करताना दिसली. या संधीचे सोन करत नोरानेही स्टेजवर आपल्या डान्सने आग लावून टाकली.

 

मात्र, यादरम्यान तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे वृत्त समोर येत आहे. कथितरीत्या नोरासोबत बॅकग्राऊंड डान्सरने अश्लील कृत्य केले आहे, ज्यामुळे चाहत्यांचा पारा चढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिच्या चाहत्यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022)मधील लाईव्ह फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरा परफॉर्म करताना दिसत आहे.

तिच्या मागे अनेक बॅकग्राऊंड डान्सरही दिसत आहेत. हे सर्वजण स्टेजवर ‘साकी साकी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.विचित्र पद्धतीने स्पर्श करताना दिसला व्यक्ती व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या शेवटी नोरा जसा आपला डान्स पूर्ण करते, तसा एक व्यक्ती पाठीमागून येतो आणि तिला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तो नोराच्या टीमचा भाग असेल आणि तो माईक किंवा तिचा ड्रेस व्यवस्थित करत असावा. मात्र, चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहताच आगपाखड करण्यास सुरुवात केली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम