‘हरियाणवी क्वीन’ सपना चौधरीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ३ डिसेंबर २०२२ I सुरुवातीला आपल्या डान्ससाठी गाव पातळीवर प्रसिद्ध असणारी ‘हरियाणवी क्वीन’ सपना चौधरी आता भलतीच गाजतेय. सपना चौधरीने तिच्या डान्सने मोठा चाहतावर्ग कमावला आहे. तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता तिचे देश आणि परदेशातही चाहते आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. त्यावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. व्हिडिओतील तिचा देसी अंदाज, डान्स आणि अदा पाहून चाहतेही घायाळ झाल्याशिवाय राहत नाहीत. अशात सपनाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सपना चौधरीचा नवीन व्हिडिओ
अभिनेत्री सपना चौधरी हिचा नवीन व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. या व्हिडिओत सपना खास स्टाईलमध्ये कंबर लचकवताना दिसत आहे. कधी ती केस उडवताना, तर कधी भिंतीवर हात ठेवून हसताना दिसत आहे. या व्हिडिओत सपनाने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

सपनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘घागरा’ गाणे वाजत आहे. या गाण्याचे बोल ‘ये खबर छपी है अख़बार में, हमारी खूब चरचा है बाज़ार में’ सपनाने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वापरले आहेत. तिचा हा अंदाज पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 800 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

 

सपनाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “जाड झालीयेस वजन कमी कर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “जिम सुरू कर नाहीतर भविष्यात तुला करिअरमध्ये खूप त्रास सहन करावा लागेल.” आणखी एकाने तिच्या गाण्यांवर कमेंट केली. त्याने लिहिले की, “आता तुझ्या गाण्यांमध्ये आधीसारखी मजा नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम