रितेश जेनेलिया यांचे वेड तुझा गीत प्रदर्शित

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १ डिसेंबर २०२२ I हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आता दिग्दर्शनात उतरला आहे. रितेश दिग्दर्शित करत असलेला ‘वेड‘ हा पहिला सिनेमा आहे. या मराठी सिनेमासाठी चाहत्यांच्या उत्सुकता आधीपासूनच वाढल्या होत्या. आता या सिनेमातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

रितेश देशमुखआणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘वेड तुझा’ बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) प्रदर्शित झाले. हे गीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर चित्रित झालेले आहे. अजय अतुलने संगीतबद्ध केलेले आणि अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं खरंच मंत्रमुग्ध करणारं आहे. या गाण्याला एकाच दिवसात युट्यूबवर 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. ‘वेड’ ही त्यांची सहावी चित्रपट निर्मिती आहे. मुंबई फिल्म कंपनीने आता ‘देश म्यूजिक’ हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम