प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून पी.डी.पाटील यांना सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर

प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून पी.डी.पाटील यांना सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा

प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून पी.डी.पाटील यांना सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर

४ डिसेंबर,२२ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे अल्पबचत भवन येथे वितरण होणार

धरणगांव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना २०२२ ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे.

पी.डी.पाटील यांची शैक्षणिक – सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन प्रोटॉन शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काकडे, जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, मिलींद निकम व संपूर्ण समूहकडून हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण ४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे होणार आहे.

ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, धरणगाव प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, कार्याध्यक्ष सतीश शिंदे व मित्र परिवाराकडून पाटील यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. पी डी पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय, खान्देशस्तरीय, जिल्हास्तरीय असे एकूण ७ पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला हा पुरस्कार जाहीर झाला हीच माझ्या कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम