अमालाचे बोल्ड लुक्स चर्चेत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १२ डिसेंबर २०२२ I ‘अमाला पॉल’ ही अभिनेत्री मुळची केरळची.२००९ साली ‘नीलथामरा’ या सिनेमात तिने सहकलाकाराची भुमिका केली होती. या सिनेमातुन तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

२०१० साली आलेल्या ‘मायना’ या रोमॅन्टिक सिनेमामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळत गेल्या.
अमाला पॉल ने तमिळ, तेलगु आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. भोला चित्रपटातून ती बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहे. तिची सिनेमात मुख्य भुमिका असणार आहे.
अमालाने तेलगु इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. तिने चार तेलगु सिनेमांमध्ये काम केले आहे ज्यात ‘नागा चैतन्य’, ‘राम चरण’ आणि ‘अल्लु अर्जुन’ यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे.
तर तिने हिंदी मध्ये यापुर्वी काम केले आहे. मात्र चित्रपट नाही तर सिरीजमधून तिने हिंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. याचवर्षी आलेल्या ‘रंजीश ही सही’ या सिरीजमध्ये तिची भुमिका होती.
अमाला ही साऊथ इंडस्ट्रीमध्ये खुप लोकप्रिय आहे. तसेच सोशल मीडियावरील तिचे बोल्ड लुक्स नेहमी चर्चेचा विषय असतात. इन्स्टाग्रामवर तिचे ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अमालाने २०१४ साली दिग्दर्शक ‘ए एल विजय’ सोबत लग्नगाठ बांधली. मात्र २०१७ मध्येच त्यांच्यात घटस्फोट झाला.
अमालाचे मध्यंतरी बिकीनी फोटोज ही खूप व्हायरल झाले होते. तिच्या बोल्ड फोटोजने इंटरनेटवर धुमाकुळ घातला होता.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम