‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला ऐश्वर्या रॉयने नकार ,जाणून घ्या कारण
मुंबई चौफेर I १२ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्यानं आता पर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काही चित्रपटांना ऐश्वर्यानं नकार दिला होता.
त्यापैकी एक म्हणजे 1998 साली प्रदर्शित झालेला ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. दरम्यान, राणी मुखर्जी आधी टीनाची भूमिका ही ऐश्वर्या रायला ऑफर केली होती. पण तिनं या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्याचा खुलासा ऐश्वर्यानं एका मुलाखतीत केला होता.
राणीनं ‘कुछ कुछ होता है’मध्ये टीनाची भूमिका साकारली होती, मात्र त्यापूर्वी या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आले होते. ऐश्वर्या राय बच्चन देखील त्यापैकी एक होती, परंतु तिनं भूमिका नाकारली. 1999 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने करण जोहरचा चित्रपट का नाकारला याचा खुलासा केला. राणी म्हणाली, ‘कुछ कुछ होता है’साठी करण जोहरनं माझ्याशी संपर्क साधला होता, पण तो जी तारिख मागत होता ती तारिख मी आधीच आरके फिल्मसला दिल्या होत्या.
ऐश्वर्याने पुढे सांगितले की, तिला ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात अशा भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, जी ती तिच्या मॉडेलिंगच्या काळात करत होती. केस सरळ करणं, मिनी स्कर्ट घालणं, कॅमेऱ्यासमोर ग्लॅमर दाखवणं. जर मी हा चित्रपट केला असता तर माझी लिंचिंग झाली असती. (सगळ्यांनी मिळून माझ्यावर हल्ला केला असता हा संदर्भ लावत ऐश्वर्यानं लिंचिंग हा शब्द प्रयोग केला होता.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम