उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १२ डिसेंबर २०२२ I उर्फी जावेदची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली.

पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. अशात उर्फी सध्या अडचणीत आली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वकील असलेल्या अली काशीफ खान देशमुख यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे उर्फी अडचणीत सापडली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम