अभिनेता अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १२ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अरबाज पत्नी मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर आता इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियामुळे नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

दुसरीकडे, जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. जॉर्जिया जेव्हा फोटो शेअर करते की तेव्हा काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता अरबाजपेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या जॉर्जिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण जाणून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

जॉर्जियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी नुकतीच एका मोठ्या दुर्घटनेतून बचावल्याचं दिसत आहे. रोड क्रॉस करताना ती दोन गाड्यांच्या मध्ये आली आणि जॉर्जिया पुढे जाणार इतक्यात तिला समजलं की गाडी पार्क असलेली गाडी मागे येत आहे.

तेवढ्यात जॉर्जिया गाडीच्या डिक्कीवर जोरात हात मारते. त्यामुळे गाडीत बसलेल्या चालकाला मागे कोणीतरी असल्याचं समजतं. यानंतर ड्रायव्हर तात्काळ ब्रेक लावतो ज्यामुळे जॉर्जिया जखमी होण्यापासून बचावते. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सनी मलायकाच्या नावाने जॉर्जियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम