उर्फीने साडी घातली ,हवेची झुळूक आली अन झाले काय ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १२ डिसेंबर २०२२ I आपल्या कपड्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री उर्फी जावेद बऱ्याच दिवसांनी चांगल्या पोशाखात मीडिया समोर आली होती. तेव्हा सर्वांना वाटले आता उर्फी फक्त फोटोसाठी पोज देऊन निघून जाईल.

कारण तिने परिधान केलेली साडी चर्चेत राहण्यासारखी नव्हती. परंतु हवेची झुळूक आली आणि उर्फीचा पदर सरकला. उर्फीला याचं वाईट तर वाटलं नाही उलट तिने त्यालाच हटके स्टाईल समजून पोज दिल्या.म्हणूनच सध्या चांगल्या वेषभूषेमध्ये येऊन सुद्धा उर्फी ट्रोल होतीए.

मुंबई विमानतळावर हा प्रकार घडला. नेहमी अतरंगी पोशाखात फिरणारी उर्फी यावेळी साधी आणि सुंदर साडी परिधान करून आली होती. विमानतळावर असलेल्या पापाराजीला उर्फीने पिझ्झा देखील दिला. गेटवरती मीडियाला पोज देण्यासाठी ती थांबली आणि जोरात वारा आला. जोरात आलेल्या हवेमुळे उर्फीला आपला पदर सांभाळणे देखील कठीण जात होते तरीही ती मीडियासाठी पोज देत होती. खांद्यावरील पदर इतका खाली घसरला होता की उर्फीला तो सावरण्यासाठी एका महिलेची मदत घ्यावी लागली. यावेळेसचा उर्फीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम