विनायक मेटे अपघात प्रकरणी सीआयडीची कारवाई
मुंबई चौफेर | १६ नोव्हेंबर २०२२ | शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कार चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम