समाजवादी पार्टीचे आ. अबू आझमी यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १५ नोव्हेंबर २०२२ | समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या मालमत्तांवर प्राप्तीकर खात्याच्या पथकाने छापे टाकले असून झाडाझाडती सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशासंबंधी ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ यांसह इतरही ठिकाणांवर ही छापेमारी झाली आहे. यातील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र इन्कम टॅक्सच्या रडारवर आत अबू आझमी असल्याचे यातून दिसून आले आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम