विनयभंग प्रकरणात आ. जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १५ नोव्हेंबर २०२२ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला असून ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती असं सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते अशी माहिती त्यांनी कोर्टात दिली. तसंच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती असा दावा त्यांनी केला. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम