पाळधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

पाळधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

बातमी शेअर करा

पाळधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

धरणगाव पंचायत समितीचा शिक्षण विभाग व भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पसतर्फे ४९वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जीपीएस कॅम्पस येथे झाले.यात तालुक्यातील १२३ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रकल्प सादर केले.प्रदर्शनात प्राथमिक गटात अयान खाटीक,माध्यमिक गटात धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.प्रदर्शनाचे उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव,शिक्षणाधिकारी विकास पाटील,डायटचे प्राचार्य अनिल झोपे,गटविकास अधिकारी सुशांत पाटील,जीपीसचे कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील,पं . स . चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, मुख्याध्यापक डी.डी.कंखरे उपस्थित होते.प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिहाडे यांनी केले.परीक्षण डी.ए.धनगर,संजय पाटील, आर.सी.कोळी यांनी केले.ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन,नाना पाटील यांनी अद्याभार मानले

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम