धरणगावात महात्मा बळीराजांची मिरवणूक व प्रतिमेचे पूजन

धरणगावात महात्मा बळीराजांची मिरवणूक व प्रतिमेचे पूजन

बातमी शेअर करा

धरणगावात महात्मा बळीराजांची मिरवणूक व प्रतिमेचे पूजन

बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे खऱ्या बळीराजांचा सन्मान

धरणगाव : येथे ‘बळीराजा गौरव उत्सव समिती’ तर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण व वंदन करून ‘इडा पिडा टळो नि,बळीचे राज्य येवो’च्या गजरात बलिप्रतिपदेनिमित्त महात्मा बळीराजांच्या भव्य प्रतिमेची सजवलेल्या बैलगाडी वर पिल्लू मस्जिद,बस स्थानक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छ.शिवराय स्मारक, परिहार चौक, कोट बाजार येथून सवाद्य मिरवणूक काढून साने पटांगण येथे शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते जगाचा पोशिंदा, शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी सदर मिरवणुकवेळी तात्यासाहेब फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आबासाहेब शिवराय, जय जवान-जय किसान चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. हेमंत माळी सर यांनी आपल्या प्रास्ताविकात काळाच्या उदरात गडप झालेल्या बळीराजाच्या इतिहास राष्ट्रपिता तात्यासाहेब फुले यांनी उजेडात आणला व तात्यासाहेब फुल्यांनी बहुजनांचे खरे ” कुलस्वामी ” ही उपाधी देऊन महात्मा बळीराजांचा गौरव केला.
याप्रसंगी जगाचे खरे पोशिंदे
शिवाजी बाबुराव देशमुख, बापू परभत धनगर, अनिल दौलत कंखरे, प्रभाकर भिला पाटील, विक्की अनिल धनगर, नंदू विठ्ठल धनगर, पंढरीनाथ अर्जुन वाघ, भिमराज अर्जून पाटील, सुनिल छन्नू पाटील (भोद), मनोज तुकाराम पाटील (वंजारी खपाट) यांनी मिरवणुकीत आपली बैलगाडी सजवून आणल्या होत्या, यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी नांगराचे पुजन करून बळीराजाला अभिवादन केले. म्हणून खऱ्या बळीराजा शेतकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळ, टोपी व गुलाबपुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रतिमा पूजनवेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी महात्मा बळीराजा उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांची स्तुती करीत बळीराजा उत्सवनिमित्ताने सर्वांना सदिच्छा व्यक्त केल्या. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शहरात महात्मा बळीराजा स्मारक व्हावे अशी आठवण करून दिली. भारत मुक्ती मोर्चा प्रदेश सचिव मोहन शिंदे यांनी बळीराजांचे सुखी समाधानाचे राज्य पुन्हा यावे असे मत व्यक्त केले. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी बळीराजांच्या काळात शेतकरी हा सुखी होता आणि पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे अशी अपेक्षा व्यक्त केल्यात. जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन यांनी कधी नव्हे ती आज बळी राज्याचे पुनरुज्जीवन करायची गरज प्रकर्षाने निर्माण झालेली आहे असे श्री. महाजन म्हणाले. शेवटी लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दे दान सुटे गिऱ्हाण..
इडा पिडा टळू दे नि,
बळीचं राज्य येवू दे..
असे आजही आपल्या माय-भगिनी बळीराजा परत यावा म्हणून आठवण करतात. बळीराजा म्हणजे शेतकरी आणि राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे तो आत्महत्या करतो एवढेच शहरातील लोकांना माहित असते. पण खरा बळीराजा हा नुसता शेतकरी नव्हता तर अन्नधान्याचे समान वाटप करणारा, समतेचा पुरस्कर्ता शासक होता म्हणूनच आपल्या मायबहीणी बळीराजाची आठवण दरवर्षी काढतात आणि त्याचं राज्य परत यावे याची कामना करतात. आपण बळीराजाचे वंशज आहोत. विषमतेविरुध्दच्या लढाईचे सैनिक आहोत. आपण या बळीराजाला आठवूया आणि आजच्या समाजाला संविधानावर आधारित समतेच्या राज्याची आठवण करुन देऊया. आजच्या बलिप्रतिपदा अर्थातच बळीराजा गौरव दिनी हा निश्चय निश्चितच करुया आणि बळीराज्य म्हणजे समतेचं राज्य, अर्थातच संविधानाचं राज्य मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया असे सहज सोप्या शब्दात महात्मा बळीराजा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत श्री.पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच खान्देशातील प्रसिद्ध चित्रकार योगेश सुतार, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी उपतालूका प्रमूख राजेंद्र ठाकरे न.पा.गटनेते विनय पप्पू भावे, नगरसेवक भागवत चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गोविंद कंखरे, संतोष सोनवणे, विजय महाजन, महेंद्र भैय्या महाजन, गोरख देशमुख, करीम लाला, किशोर पवार, रविंद्र मराठे, सुधाकर मोरे, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, आनंद पाटील, संजय चौधरी, वाल्मीक पाटील, अमोल सोनार, नगर मोमिन, गणेश महाजन, राहुल रोकडे, सुदर्शन भागवत, वसीम पिंजारी, राहुल मराठे, एकनाथ चित्ते, लालचंद वाघ, छोटू धनगर, भूरा माळी, गोपाल धनगर, कमलेश बोरसे, नितीन महाजन, मधुकर माळी, महेंद्र चौधरी, गोपाळ पाटील, आदींसह पत्रकार ॲड वसंतराव भोलाणे, जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे व गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मराठे यांनी तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम