धरणगावात गुलाबराव पाटील व अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेमार

धरणगावात गुलाबराव पाटील व अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेमार

बातमी शेअर करा

धरणगावात गुलाबराव पाटील व अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेमार

शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पोलिस ठाण्यात निवेदन सादर

धरणगाव : राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छ्ता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अशलाघ्य शब्दात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.याच्या निषेधार्थ आज धरणगावात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवसेना (उबाठा) पक्षाकडून दोघंही मंत्र्यांचा प्रतीकात्मक छायाचित्राला जोडे मार आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.तदनंतर धरणगाव पोलिसात निवेदन सादर करण्यात आले.कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी उपजिल्हाप्रमुख ॲड.शरद माळी,जि.प.सदस्य जानकीराम पाटील,पं.स.सभापती दीपक सोनवणे,रमेश पाटील,राजेंद्र ठाकरे, योगेश वाघ,भागवत चौधरी,धीरेंद्र पूरभे,संतोष सोनवणे,विनोद रोकडे, गणेश माळी,जयेश महाजन, भाऊसाहेब सोनवणे,रविंद्र जाधव, भीमराव धनगर,जितेंद्र धनगर,भरत माळी,सुरेश महाजन,गोपाळ पाटील, राहुल रोकडे,यांच्यासह माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ,नगरसेविका कीर्ती मराठे,सौ.अग्निहोत्री,सुनीता चौधरी,असंख्य शिवसैनिकांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम