‘चंद्रमुखी 2’ लवकरच येणार रसीकांच्या भेटीला

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ११ डिसेंबर २०२२ I बॉलिवूडमधील धाकड गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यामुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते.आजपर्यत तिने बॉलिवूडबद्दल अनेक बेधडक पोल खोल केली आहे. मात्र, यावेळीस अभिनेत्री आपल्या नवीन चित्रपटामुळे खूप चर्चेत आली असून अभिनेत्री साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे.

बॉलिवूड क्वीन अर्थातच कंगना रानौत आपल्या नवीन चित्रपटामधून साउंथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लायका प्रोडक्शनने नुकतंच सोशल मीडियावद्वारे कंगनाचे फोटो शेअर करत चागत्यांना माहिती दिली आहे. त्यासोबतच साउथ इंडस्ट्रीने तिचे स्वागतही केले आहे. साउथमधील ‘चंद्रमुखी‘ हा ब्लॉकबास्टकर चित्रपट माहितच असेल. याच चित्रपटाचा पार्ट लवकरच बननार असून कंगना त्यांमध्ये काम करणार आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये इंडस्ट्रीमधील थलैवा म्हणून ओळखले जाणानरे प्रसिद्ध अभिनेता
रजनीकांत आणि नयनतारा यांची हॉरर कॉमेडी पाहायाल मिळाली होती. चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती.

आता या चित्रपटाचा नवीन सीक्वल ‘चंद्रमुखी 2’ येत आहे. ज्यामध्ये कंगना आणि राघव लॉरेंस मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना चंद्रमुखी बनून प्रेक्षकांच्या भेटीस उतरणार असून राजाच्या दरबारमध्ये नृत्यकी म्हणून डान्स करणार आहे. मात्र, अजून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अजून जाहिर केली नाही.
कंगना काही दिवसांपूर्वीच साउथ इंडस्ट्रीमध्ये वळण्याचा प्रयत्न करत होती. त्याशिवाय तिने तामिळनाडुमधील पूर्व सीएम जयललिता यांचा बायोपिक ‘
थलाइवीचित्रपटामध्ये काम केले होते. तेव्हा तिच्या अभिनेयाचे खूपच कौतुक केले होते मात्र, कमाइच्या बाबतीत चित्रपटाने खास कमाल केली नव्हती.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने नुकतंच ‘इमरजेंनसी या चित्रपटाची शुटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपाटचे दिग्दर्शन स्वत: कंगनाने केले आहे. हा चित्रपट पॉलिटीकल ड्रामा असून इंदिरा गाधी यांच्या जिवन प्रवासावर अवलंबून आहे. यामध्ये कंगनाने इंदिरा गांधी याची भूमिका निभावली आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम