सुवर्ण महोत्सवी शाळेत राजमातेस अभिवादन

सुवर्ण महोत्सवी शाळेत राजमातेस अभिवादन

बातमी शेअर करा

सुवर्ण महोत्सवी शाळेत राजमातेस अभिवादन

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र म्हणजे ऊर्जा स्रोत- एस.व्ही.आढावे.

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांचा स्मृतिदिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, ज्येष्ठ शिक्षिका सौ.पी.आर.सोनवणे मॅम यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अहिल्यामाईंचे जीवन चरित्र हे आपल्यासाठी ऊर्जा स्रोत आहे. अहिल्यामाई ह्या कर्तबगार, श्रेष्ठ राजकारणी,थोर मुत्सद्दी, उत्कृष्ट प्रशासक, धैर्यवान, सामर्थ्यशाली, प्रजावत्सल राज्यकर्त्या होत्या. असे प्रतिपादन शाळेतील शिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम