धरणगाव पत्रकार संघाच्या सहकार्याने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अंतर्गत “हर घर झेंडा” पथकाची जनजागृती

धरणगाव पत्रकार संघाच्या सहकार्याने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अंतर्गत "हर घर झेंडा" पथकाची जनजागृती

बातमी शेअर करा

धरणगाव पत्रकार संघाच्या सहकार्याने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अंतर्गत “हर घर झेंडा” पथकाची जनजागृती

धरणगाव : भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्याचे निमित्ताने सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम, मोहिमा राबविल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने, गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व धरणगाव तालुका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने श्री.गुरुदेव सेवा मंडळ कोळंबा ता.चोपडा संचलित गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी धरणगाव तालुक्यात हर घर तिरंगा अभियानाचा मुळ उद्देश देशातील नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे, व प्रत्येक भारतीय नागरिकाने हर घर झेंडा अभियानात सहभागी व्हावे हा आहे. यानिमित्ताने दि.१२, शुक्रवार पावेतो तालुक्यातील ६० गावापर्यंत जावून समाज प्रबोधन केले आहे. दरम्यान, श्री.गुरुदेव सेवा मंडळ कोळंबा येथील गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवित असलेल्या कार्यकर्त्यांनी दि.१२, शुक्रवार रोजी धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ स्वातंत्र्य संग्रामावेळी झालेल्या घटनेवर, भारतीय राज्य घटना, लोकशाही अबाधित राखणे, देशभक्तीपर गीते या विषयावर शाहीर रघुनाथ बाविस्कर, देविदास बाविस्कर, अशोक बाविस्कर, रघुनाथ बाविस्कर, हरी बाविस्कर, सुखदेव बाविस्कर, रोहिदास बाविस्कर, कलाबाई बाविस्कर, सुनंदा बाविस्कर आदींनी लोकगीते, पोवाडा गावून समाज प्रबोधन केले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार बी एन चौधरी, धर्मराज मोरे, डी एस पाटील, विनोद रोकडे, निलेश पवार, पी डी पाटील, सतिष शिंदे, भगीरथ माळी, हर्षल चौहान, अविनाश बाविस्कर, राजेंद्र वाघ यांच्यासह अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम