सुवर्ण महोत्सवी शाळेत विदेशातून [ बेल्जियम ] निखील सोनवणे यांनी ऑनलाईन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सुवर्ण महोत्सवी शाळेत विदेशातून [ बेल्जियम ] निखील सोनवणे यांनी ऑनलाईन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बातमी शेअर करा

सुवर्ण महोत्सवी शाळेत विदेशातून [ बेल्जियम ] निखील सोनवणे यांनी ऑनलाईन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शाळेतील विद्यार्थिनींची मोफत तपासणी व उपचार करू – डॉ.अश्विनी देवकीनंदन वाघ.

धरणगांव स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मोबाईलचे वापराचे दुष्परिणाम या विषयावर ऑनलाइन व्याख्यान व किशोरवयीन मुलींचा आरोग्य मेळावा मोठ्या उत्साहात घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक एस.व्ही.आढावे यांनी केले. सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने शाळेचे माजी विद्यार्थी तथा “इन्फोसिस कंपनीचे प्रोजेक्ट हेड “, शाळेचे माजी विद्यार्थी निखिल रविंद्र सोनवणे यांनी विदेशातून म्हणजेच बेल्जियम ( युरोप ) या देशातील ब्रुसेल्स या शहरातून मोबाईलचे वापराचे दुष्परिणाम, फायदे – तोटे विस्तृतपणे मुलांना सांगितले, मुलांच्या शंकांचे निरसन केले. पुस्तकांवर प्रेम करा जास्तीत जास्त पुस्तक वाचा आणि शाळेचे नाव उज्वल करा असा संदेश त्यांनी दिला.

यानंतर किशोरवयीन मुलींचा आरोग्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पी.आर.सोनवणे मॅम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव शहरातील वाघ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अश्विनी देवकीनंदन वाघ हे होते. किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे, मानसिक – शारीरिक बदल , सकस आहाराचे महत्त्व या विविध विषयांवर मुलींना विस्तृत असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.

अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शाळेतील दोन्ही पटांगण, शालेय परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.जे.महाजन यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षिका एम. के.कापडणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम