नेहा शर्माचे गोव्यातील ग्लॅमरस फोटोशूट

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २५ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सध्या गोव्यात डिसेंबर वॅकेशन एन्जॉय करतेय. नेहानं तिच्या वॅकेशनचे काही क्षण कॅमेरात टिपले असून ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.नेहा शर्माने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू चित्रपट चिरतमधून केली होती.गोव्याच्या सेंट रेजिस या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेहा सुटीचा आनंद घेत आहे.


यात तिनं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटही केलं आहे. नेहा शर्मा नेहमी तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते.गोवा म्हटलं आणि समुद्रकिनारी फोटोशूट नाही हे म्हणजे निव्वळ अशक्यच. नेहाचाही गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर हॉटनेसचा जलवा पाहायला मिळाला.इन्स्टाग्रामवर नेहाचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

नेहा शर्मा क्रुक, क्या सुपर कूल है हम, यंगिस्तान, यमला पगला दीवाना, तुम बिन २, मुबारका आणि तान्हाजी या सिनेमात झळकली आहे.
नेहा शर्मा लवकरच ‘हेराफेरी-३’ मध्ये दिसणार आहे. चाहते तिच्या आगामी सिनेमासाठी उत्सुक आहेत.नेहा शर्माचे इन्स्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सिनेमांपेक्षा ग्लॅमरस फोटोंमुळे अभिनेत्री नेहा शर्मा चर्चेत असते .

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम