अवतार: द वे ऑफ वॉटर प्रदर्शनाआधीच झाला लीक

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १६ डिसेंबर २०२२ I सध्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ऑनलाइन लीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. पण जेव्हा एखाद्या चित्रपटाची प्रक्षेक वाट पाहत असतात अशावेळी 24 तास आधी चित्रपट लीक होणे त्रायदायक ठरु शकते.

बहूप्रतिक्षित चित्रपट, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) काही युरोपियन देशांमध्ये रिलीज होण्यापूर्वी लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे. आलेल्या माहितीनुसार हा हाय प्रोफाईल चित्रपट भारतातील काही टोरेंट वेब साइटवर (Website) लीक (Leak) झाला आहे. गुरुवारी संध्याकाळीच या साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आणि जे लोक टोरेंट साइटवरून चित्रपट डाउनलोड करतात ते हा चित्रपट पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवतार: द वे ऑफ वॉटर शुक्रवारी सकाळी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे आणि त्यानंतर अशा वेबसाईटवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट्स दिसण्याचा धोका वाढेल.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम