धरणगावच्या किरण पाटील यांना BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२, पुरस्कार प्रदान

धरणगावच्या किरण पाटील यांना BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२, पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा

धरणगावच्या किरण पाटील यांना BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडिया २०२२,पुरस्कार प्रदान

धरणगाव : धरणगाव येथील के.पी. मेकओव्हर ब्युटी पार्लरच्या संचालिका श्रीमती किरण पाटील यांना BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडियाज बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड २०२२ हा गुजरातमधील सुरत येथे नुकताच आयोजित करण्यात आलेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापुरस्कार प्रदान समारंभात स्टार प्लस टीव्ही चॅनलची कलाकार “गुम है किसी के प्यार में” कार्यक्रम मधील आशिया सिंग, ज्या सई या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील श्रीमती पाटील यांना जळगाव जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. श्रीमती पाटील यांनी धरणगाव व संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे, श्रीमती पाटील यांच्या मित्रपरिवार, हितचिंतक आणि कुटुंबीयांनी अभिनंदन पाठवून उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम