जॅकलिन फर्नांडिस सोनू सूदची जोडी आगामी चित्रपटांमध्ये दिसणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २९ डिसेंबर २०२२ I बॉलीवूड दिवा जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच रिलीज झालेल्या ‘सर्कस’ चित्रपटातील तिच्या सुंदर रेट्रो लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
तसेच, 2023 मध्येही जॅकलिन तिच्या जबरदस्त लाइनअपसह चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे.
जॅकलिन लवकरच सोनू सूदसोबत आगामी चित्रपट ‘फतेह’साठी हातमिळवणी करणार असून दोन्ही कलाकार पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रांत रोना’ चित्रपटातील ‘रा रा रक्कम्मा’ या गाण्याने जॅकलिन फर्नांडिसला ब्लॉकबस्टर यश मिळवून दिले. तसेच, प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांनी अभिनेत्रीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुकदेखील केले. याशिवाय ‘सर्कस’ चित्रपटातील तिचा कधीही न पाहिलेला विंटेज लूकही सर्वांना आवडला आहे.

याशिवाय जॅकलिनच्या ‘क्रॅक’ चित्रपटाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली असून ती हॉलिवूड प्रोजेक्ट ‘टेल इट लाइक अ वुमन’मध्येही दिसणार आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम