खा.संजय राऊत जामीन प्रकरणी धरणगावात ठाकरे गटाचा ढोल-ताशे, फटाक्यांसह जल्लोष
खा.संजय राऊत जामीन प्रकरणी धरणगावात ठाकरे गटाचा ढोल-ताशे, फटाक्यांसह जल्लोष
खा.संजय राऊत जामीन प्रकरणी धरणगावात ठाकरे गटाचा ढोल-ताशे,फटाक्यांसह जल्लोष
‘टायगर इज बॅक’ ; शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ
धरणगाव : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने छ.शिवरायांच्या स्मारकाजवळ धरणगावात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने ढोल-ताशे, फटाके वाजवून जल्लोष केला.तत्पूर्वी छ. शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले,माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले.तदनंतर शहरात जल्लोष मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर आली असून ४० खोके घेवुन माजलेल्या मस्तवाल बोक्यांवर पुन्हा धडाडणार आहे. तद्नंतर जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी ‘टायगर इज बॅक’ अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख ॲड.शरद माळी, माजी जि.प. सदस्य जानकीराम पाटील, प.सं. सदस्य दीपक सोनवणे, रमेश माणिक पाटील, नाना ठाकरे, भागवत चौधरी, धीरेंद्र पूरभे, पांडुरंग महाराज, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, शहराध्यक्ष संभाजी कंखरे, किरण अग्निहोत्री, करीम लाला, फिरोज खान, नदीम खान, लिलाधर पाटील, जितेंद्र न्हायदे, भरत महाजन, किरण मराठे, बापू नागाभाऊ, नंदलाल पाटील गोविंद पा. काशिनाथ पा. राहुल पा. किरण पा. नरेश पा. नरेंद्र पाटील, नवल महाले, गोपाळआण्णा महाजन, गणेश महाजन, गोपाळ पाटील, यांच्यासह असंख्य शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम