खोदलेल्या रस्त्यांमुळे धरणगावकर संतप्त, साईट इंजिनिअरची उडवाउडवीची उत्तरे

खोदलेल्या रस्त्यांमुळे धरणगावकर संतप्त, साईट इंजिनिअरची उडवाउडवीची उत्तरे

बातमी शेअर करा

खोदलेल्या रस्त्यांमुळे धरणगावकर संतप्त, साईट इंजिनिअरची उडवाउडवीची उत्तरे

प्रगती कन्ट्रक्शन कंपनीचा गलथान कारभार; सौ.मंजुषा डहाळे

धरणगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कंपनीकडून अंडर ग्राउंड पाइप लाईन टाकण्यासाठी शहरासह, जैन गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते खोदून ठेवले आहे. याबाबत त्रस्त व संतप्त जैन गल्लीतील नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत प्रगती कन्ट्रक्शन लातूर, कंपनीकडून शहरातील अंडरग्राउंड पाईपलाईन टाकण्याकरिता सर्वत्र रस्ते खोदाईचे काम सुरू आहे. परंतु, जैन गल्ली परिसरात आधीच रस्ता अरुंद त्यातही रस्त्याच्या मध्यभागी खोल खोदून ठेवलेली चारी, यामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालकांबरोबरच जैन गल्ली परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अश्या ठिकाणी अपघात होण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामूळे परिसरातील नागरिकांनी खोदाईचे काम तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर बुजविण्यात यावे. यासाठी स्थानिकांनी पालिकेत येवून प्रगती कन्ट्रक्शनचे प्रोजेक्ट साईट इंजिनियर स्वप्निल पाटील यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की, सद्यास्थितीत आमच्याकडे पाईप शिल्लक नाहीत. म्हणुन विलंब होत आहे. पाईप उपलब्ध झाल्यावर पाईप टाकून लवकरात लवकर बुजविण्यात येईल. असे प्रगती कन्ट्रक्शनचे प्रोजेक्ट इंजिनीयर पाटील म्हणाले.
यामुळे शहरात खोदाईचे काम चालल्याने नागरीकांना पायी जाणे सुद्धा त्रासाचे व गैरसोईचे होत आहे. खोदकाम झाल्यावर अंडर ग्राउंड पाइप टाकण्याचे काम होणार असून त्यानंतर बुजविण्याचे काम सुमारे कित्येक दिवस चालणार आहे, तोपर्यंत नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी, अबालवृद्ध यांना वाहतूक कोंडीला व रहदारीला रोज सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित..
यावेळी माधुरी जैन, मंजुषा डहाळे, शोभा जैन, सोनाली जैन, मालती जैन वृषाली जैन, सविता जैन, राजेश प्रभाकर जैन, नितीन जैन, अरुण जैन, प्रफुल जैन, श्लोक डहाळे, सारंग जैन, स्वप्नील जैन, हंसराज बयस, विशाल जैन, अस्लम पठाण, विनोद रोकडे यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम