कै.भिकन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
कै.भिकन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
कै.भिकन पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
भिकन अण्णांची पोकळी भरून निघणार नाही -कडू महाजन
धरणगाव येथील लहान माळी वाडा परिसरातील संत तुकाराम महाराज चौकात कै.भिकन जगन्नाथ पाटील (सामग्री प्रबंधक सुभेदार, संभाजीनगर) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा घेऊन आदरांजली अर्पण करण्यात आली.
सर्वप्रथम भाजप गटनेते कैलास माळी सर, बालाजी बँकेचे मॅनेजर राजेंद्र महाजन, कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांच्या हस्ते कै. भिकन अण्णांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच उपस्थित सर्वांनी अण्णांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी सांगितले की, भिकन अण्णांच्या जाण्याने फक्त परिसराची नव्हे तर गावाची हानी झाली आहे, अण्णांची पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. भाजप गटनेते कैलास माळी सरांनी देखील भिकन पाटील यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. भिकन अण्णा अजातशत्रू असे व्यक्ती होते असे प्रतिपादन माळी सरांनी केले. कुणबी पाटील पंच मंडळाचे खजिनदार लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की आपल्याकडून कोणाचे चांगले होत नसेल तर हरकत नाही परंतु आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाणार नाही एवढं जरी केलं तरी तीच अण्णांना खरी आदरांजली ठरेल. भिकन अण्णांचे सवंगडी किरण अग्निहोत्री यांनी देखील एक सच्चा दोस्त गमावल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष व सर्व संचालक, समस्त माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ, समस्त मराठे समाज अध्यक्ष व पंच मंडळ, समस्त तिळवण तेली समाज अध्यक्ष व पंच मंडळ, जयहिंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष व सदस्य, जयहिंद गणेश मित्र मंडळाचे सर्व सदस्य, कै. भिकन पाटील यांच्या परिवारातील सदस्य तसेच मित्र परिवार, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कै. भिकन पाटील यांच्या मित्र परिवाराने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लहान माळी वाडा परिसरातील सर्व युवक मित्रांनी परिश्रम घेतले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम