समंथाचा ‘शाकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित होणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । २ जानेवारी २०२३ ।टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अलीकडे तिच्या नव्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. दरम्यान, आता येत्या काळात समंथाचा ‘शाकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत माहिती देत समंथाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

हा चित्रपट महाकवी कालिदास यांच्या संस्कृत नाटक ‘अभिज्ञान शाकुंतलम’ वर आधारित असणार आहे. या चित्रपटात राजा दुष्यंत आणि शकुंतलेची प्रेम कथा दिसणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन गुना शेखरने केलं असून हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 300 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. समंथा रुथ प्रभू व्यतरिक्त मल्याळम अभिनेता देव मोहन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

शिवाय सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ.एम.मोहन बाबू प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, अदिती बालन हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आण हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटांमध्ये देखील दिसणार समंथा

या चित्रपटानंतर समंथा ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये देखील दिसून येणार आहे. तसेच ती विक्की कौशलसोबत ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये देखील दिसून येणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम