मुंबईत पार पडणार एसटी कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक
एसटीच्या विलीनीकरणावरून गेल्या तीन महिण्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटी कर्मचार्यांचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या 85 दिवसांपासून एसटी कर्मचाायांचा संप सुरू आहे. एसटी संपाबाबत आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता वाढली आहे
राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांचे प्रमुख मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाला नकार दिल्यानंतर संप चिघळण्याची शक्यता होती. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले तरी कर्मचारी आपल्या मतावर ठाम आहे. कर्मचाऱ्यांसह परिवारास देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जवळपास 41 टक्क्यांची पगारवाढ देऊन नोकरीत पुन्हा रूजू होण्यासाठी आवाहन केलं. मात्र, अद्याप काही संघटना संपावर ठाम आहेत.संपकरी एकाच मागणीवर ठाम असून, शासनाकडून तोडगा निघत नाही, या अडचणीत कर्मचाऱ्यांचे कुटूंब अडकले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याने संप चालू ठेवायचा, की मागे घ्यायचा यावर मोठा निर्णय येणं अपेक्षित आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम