माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

बातमी शेअर करा

माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

महात्मा फुले हायस्कूल शाळेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी “महात्मा फुले हायस्कूल” शाळेत आज रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन अंतर्गत एचडी माळी यांनी आपले भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा आहे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे एस पवार होते. तद्नंतर व्ही टी माळी व एस एन कोळी यांनी माहिती अधिकाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तद्नंतर माहिती अधिकार कायदा महासंघाचे कार्यकर्ते पी.डी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, एकविसाव्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला प्रशासकीय कारभाराची माहिती सहजगत्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती मिळविणे हा तुमचा आमचा व सर्व नागरिकांचा मुलभूत अधिकार असून, “समवृध्द लोकशाहीचा तो पाया आहे.” म्हणनूच शासकीय कारभारात प्रशासन यंत्रणेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि खुलेपणा असणे आवश्यक आहे. जनतेच्या मुलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि हा अधिकार त्यांना परिणामकारक रित्या वापरता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याने, माहिती अधिकाराचा अध्यादेश व त्या खालील नियम, राज्यभर २३ सप्टें, २००२ पासून लागू केला होता. केंद्र शासनाने १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ ऑक्टो,२००५ ला लागू झाला. सदर मा.अ.कायदा सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. याकरिता माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, याच हेतूने धरणगावातील आरटीआय कार्यकर्ते ॲड. आशिष बाचपाई, जितेंद्र महाजन, पी डी पाटील, राजेंद्र वाघ हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नात असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा, त्याचप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासकीय त्रुटीमध्ये माहितीच्या अधिकार आहे. तसेच, कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही नागरिकास नमुन्यानुसार साध्या कागदावर दहा रुपये रोखीने किंवा चेकने अथवा डिडी भरुन किंवा न्यायालयीन दहा रुपयांचे मुद्रांक (तिकीट) चिकटवून अर्ज करता येतो. त्या व्यक्तीकडून अर्ज मिळालेपासून ३० दिवसात माहिती देणे किंवा सकारण नाकारणे बंधनकारक आहे.अर्जदारास जी माहिती पुरविणेची आहे त्यातील प्रत्येक छायांकित प्रतिस रुपये दोन रूपये प्रमाणे शुल्क टपाल खर्च आकारण्यात येतो. तसेच,माहिती अधिकार कायद्याचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर त्याबाबत तक्रार करावी. असेही आवाहन पी डी पाटील यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपल्या प्रबोधनात्मक मनोगतातून माहिती अधिकाराबाबत माहिती देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी तर आभार जे डी भोई यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी पी आर सोनवणे, एम के कापडणे, एस व्ही आढावे, सी एम भोळे, व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, जे एस महाजन, पी डी बदगुजर, ए एन पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम