महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “शाक्त शिवराज्याभिषेक” ” १५० व्या सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे "शाक्त शिवराज्याभिषेक" " १५० व्या सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “शाक्त शिवराज्याभिषेक” ” १५० व्या सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा

निबंध, चित्रकला, रंगभरण, वकृत्व स्पर्धेचे आयोजन

धरणगांव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ” शाक्त शिवराज्याभिषेक” व ” १५० व्या सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार होते. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेत घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, रंगभरण, वकृत्व स्पर्धेत प्रथम – द्वितीय – तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांची पुस्तिका व लेखणी बक्षीस देण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनी कु. सोनाली पाटील व कु.चेतना जावरे यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
शाळेचे आदर्श शिक्षक एच.डी.माळी यांनी छत्रपती शिवरायांचा दुसरा शाक्त पद्धतीने राज्याभिषेक यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले सत्यशोधक दिनाचे महत्त्व सांगून सत्याची कास धरा असे प्रतिपादन केले. यानंतर प्रमुख वक्ते पी.डी.पाटील यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना, सत्यशोधक समाजाचे मूलतत्वे, सत्यशोधक विधी, सत्य आचरण, समता, बंधुता, या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरुषांचे जीवन चरित्र वाचून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस.पवार यांनी सर्व शिक्षक बंधू-भगिनींना आवाहन केले की, आपण यापुढे सत्यशोधक पद्धतीने विवाह व विधी करावेत. हीच खरी तात्यासाहेबांना आदरांजली ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार एस.एन.कोळी यांनी केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम