लेखी आश्वासानंतर डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाची यशस्वी सांगता
लेखी आश्वासानंतर डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाची यशस्वी सांगता
लेखी आश्वासानंतर डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाची यशस्वी सांगता
आठवडाभरात वैद्यकीय मूलभूत सुविधा उपलब्ध करणार; वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील
[धरणगाव उपजिल्हा रुग्णालय प्रकरण]
धरणगाव : धरणगाव शहर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि शहर व परिसरातील गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधा, धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जवळपास एकही अद्ययावत सुविधांनी युक्त रुग्णालय नाही. त्यामुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी दि. २० सप्टे, २०२२ पासून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील व मित्र परिवाराने संविधानिक मार्गाने उपोषणास प्रारंभ केला होता. धरणगाव पासून जळगाव हे साधारणपणे ३२ ते ३५ किमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. धरणगाव ग्रामीण रूग्णालय अंतर्गत ९६ गावे आहेत. त्यामधील जवळपास शहराची ५५ हजारांच्या लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयावर आहे. धरणगाव शहर व तालुक्यातील रूग्णांना आरोग्य यंत्रणेने चांगल्या सुविधा द्याव्यात. शहर व तालुक्यातील भागातील ग्रामस्थांना अनेकदा उपचारासाठी जळगाव गाठावे लागते. तोवर जाण्याचा प्रवास खरोखरच कठीण असतो. व तोपर्यंत रूग्णास आपले प्राण गमवावे लागते, यासाठी धरणगाव येथे असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. म्हणून उपोषणकर्त्यांच्या सदरील मागण्या लक्षात घेता दि.२३ सप्टे, गुरुवार रोजी चोपडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी उपोषणस्थळी येवून उपोषणकर्त्यांच्या आरोग्य विषयक प्राथमिक मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचे लेखी पत्र उपोषणकर्ते लक्ष्मणराव पाटील यांना दिले, तद्नंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते कैलास माळी, विनय पप्पू भावे, अरविंद देवरे, धिरेंद्र पुरभे, भीमराज पाटील यांच्या उपस्थितीत उसाचा रस देवून उपोषणाची यशस्वी सांगता झाली. यावेळी सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, गटनेते कैलास माळी, जिवन आप्पा बयस, गोरख देशमुख, जितेंद्र पाटील, भिमराज धनगर, सूरज वाघरे, मयूर भामरे यांनी डॉ. पाटील यांना विश्वास देवून सांगितले की, आम्ही तुमचा रुग्णालयाच्या व कर्मचारी बांधवांच्या सोबत आहोत. या उपोषण स्थळी भेटी दरम्यान डॉ. पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा संदर्भात आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून स्वतः देतो. ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांना योग्य व त्वरित उपचाराच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी प्राथमिक मूलभूत सुविधा लक्षात घेता आठवडाभरात लाईट व्यवस्था, ईसीजी, क्ष किरण, रुग्णवाहिका, व आरोग्यविषयक इतर साहित्य लवकरात उपलब्ध करून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना संदर्भ सेवा निश्चितच पुरविण्याचा प्रयत्न करू असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे व उपोषणस्थळी सांगितले. तसेच, शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या मतदार संघाचे आमदार तथा, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सदर असलेले ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा संदर्भात कळवितो. असे प्रतापराव पाटील म्हणाले. या उपोषणाला शहर व परिसरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना, पत्रकार, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, त्याचप्रमाणे सकल माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क, बहुजन क्रांती मोर्चा, जागृत जनमंच पदाधिकारी, व शहरातील असंख्य नागरिकांनी उपोषणस्थळी येवून अभिप्राय नोंदवून समर्थन दिले व सहभागी झाले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम