महात्मा फुले हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

महात्मा फुले हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

महात्मा फुले हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

वाचाल तर वाचाल – मुख्याध्यापक जे.एस.पवार सर

पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते – ग्रंथपाल गोपाल महाजन.

धरणगाव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार सर होते. मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन – डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मुलांनी जास्तीत जास्त ग्रंथालयातून अवांतर पुस्तकांचे वाचन करावे हीच डॉ.कलाम साहेबांना खरी आदरांजली ठरेल. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक एचडी माळी यांनी शाळेच्या ग्रंथालयाला सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे लिखित “सत्यशोधक विधी “हे पुस्तक भेट दिले.

याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के.कापडणे सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाल महाजन व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम