नुसरत जहाँचा भाजपवर हल्ला , म्हणाली हिजाब आणि बिकनी घातली तरी प्रॉब्लेम

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १७ डिसेंबर २०२२ I पठाण चित्रपटातील ‘बेशरम’ गाण्यावरूनसुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि हिंदुत्ववादी संघटना या गाण्याबाबत दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानला सातत्याने विरोध करत आहेत.

भाजप नेते आणि संघटनेशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की दीपिका पदुकोणला भगव्या रंगाचे कपडे घालून चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. आता या वादात टीएमसी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ हिने उडी घेतली आहे. नुसरत जहाँ यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

नुसरत जहाँने सांगितले की, या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. नुसरत जहाँ म्हणाल्या, ‘सत्तेत बसलेला पक्ष लोकांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये नवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखाद्या स्त्रीने हिजाब घातला तरी यांना प्रोब्लेम आहे. जर एखाद्या महिलेने बिकिनी घातली तरी या लोकांना त्रास होतो. खरं तर या लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. हेच लोक नव्या पिढीच्या महिलांना काय घालायचे हे सांगत आहेत

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम