‘अवतार २’ ने ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १७ डिसेंबर २०२२ I ‘दृश्यम २’ हा या वर्षातील भारतातील एक महत्त्वाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५ कोटींची कमाई केली होती.

काल प्रदर्शित झालेल्या ‘अवतार २’ ने ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत ‘दृश्यम २’च्या जवळपास अडीच पट जास्त कमाई केली आहे.

अवतार या चित्रपटाचा दुसरा भाग असलेला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) चित्रपट १६ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सगळ्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमधून भारतात तब्बल ४ कोटी रुपये मिळाले होते. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘दृश्यम २’ लाही मागे टाकलं आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम