28 एप्रिलला रिलीज होणार मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्व्हन 2

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर ।३१ डिसेंबर २०२२ । दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्व्हन २’चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर लगेचच बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. आता निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग रिलीज करण्याची तारीख जाहीर केली.

 

पुढील वर्षी २८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबतच चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला साऊथ स्टार चियान विक्रम विचारात बुडालेला दिसतो, त्यानंतर चित्रपटाशी संबंधित विविध पात्रांची झलक दाखवली जाते. शेवटी राणी नंदिनीची भूमिका करणारी ऐश्वर्या राय आरशासमोर बसलेली दिसते. हा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले… ‘हवेत तलवार फिरवण्यासाठी सज्ज व्हा, कारण आम्ही २८ एप्रिल २०२३ ला येत आहोत. मणिरत्नम यांनी त्यांच्या ऐतिहासिक चित्रपट ‘पीएस २’ साठी तो दिवस निवडला, ज्या दिवशी प्रभास आणि एसएस राजामौली यांचा चित्रपट ‘बाहुबली २’ प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट राणी नंदिनीच्या सूडाची कथा पुढे नेताना दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम