रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसाच्या डोक्यात घातला दगड

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | १९ नोव्हेंबर २०२२ | रस्त्याच्या बाजूला उभे राहून गोंधळ घालणाऱ्या दोघांना पोलिसाने हटकल्याने याचा राग आल्याने दोघांनी वाद घालून पोलिसाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना पुण्यातील साेलापूर महामार्गावर लाेणी टाेल नाक्याजवळ घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक किशाेर साळुंखे (वय २०) आणि मयूर बबन आंबेकर (वय २८, दाेघेही रा.मांजरी खुर्द) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत. पाेलिस शिपाई संदीप धुमाळ (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आराेपींविराेधात लाेणी काळभाेर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. आराेपी विवेक साळुंखे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम