लग्नाचा अद्याप विचार नाही प्रभासने केला खुलासा

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर ।३१ डिसेंबर २०२२ । पौराणिक कथांपासून ऍक्‍शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्‍शन पर्यंत भारतीय सुपरस्टार ‘प्रभास’ने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे.
https://twitter.com/WeLoveMegastar/header_photo
त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. आणि त्यामुळेच प्रभासने एक नवे शिखर गाठले असून, तो लवकरच आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास सोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित असून, या चित्रपटाचे डायरेक्‍शन ओम राऊत करणार आहेत.

दरम्यान, बाहुबली फेम प्रभास 43 वर्षाचा असून चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. प्रभास कधी लग्न करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो. नुकतंच प्रभासनं एका शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शोमध्ये अभिनेत्याला त्याच्या लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. यामुळे अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.शोच्या होस्टने अभिनेत्याला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. यावर प्रभास म्हणाला, ‘मला याबद्दल कल्पना नाही सर. सध्या लग्नाबद्दल मला काहीही माहिती नाही. मी लग्न नक्की करेल, पण नशिबात अद्याप लग्न लिहिलेलं नाही.’ असं अभिनेता प्रभास यावेळी म्हणाला. सध्या या वक्तव्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम