उर्वशी रौतेलाने केली ऋषभ पंतसाठी प्रार्थना

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I 30 डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत साठी प्रार्थना केली. ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला आहे, त्याच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला जखमा झाल्या आहेत.
https://twitter.com/sachinsingh1010/status/1608665383606816768/photo/1
पंतच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते आणि क्रिकेटप्रेमी त्याच्यासाठी चिंतेत पडले आहेत. पंत लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर सर्वजण प्रार्थना करत आहेत. अशातच आता ऋषभ पंतसाठी उर्वशीने लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. उर्वशीने आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. मात्र, यावरून नेटीझन्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. अनेकजण तिला ट्रोल करत ‘नागिन’ म्हणत आहेत.


उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऋषभ पंतचे नाव लिहिले नसून काही पांढऱ्या रंगाच्या पक्षाची इमोजीसह Praying असं लिहिलं आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम