अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचारी शुभम सोनवणे कुटुंबीयांना मदतीचा हात

अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचारी शुभम सोनवणे कुटुंबीयांना मदतीचा हात

बातमी शेअर करा

अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचारी शुभम सोनवणे कुटुंबीयांना मदतीचा हात

सोनवणे कुटुंबीय शासनाच्या मदतीपासून वंचितच!
ग्रामीण गृहनिर्माण संघटनेचे अध्यक्ष,अभियंता व सदस्यांच्या माध्यमातून दिलासा..

धरणगाव : धरणगाव येथे पंचायत समिती ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी कर्मचारी शुभम संजय सोनवणे हे शासकीय काम आटोपून अमळनेर येथे मोटारसायकलने घरी जात असताना टाकरखेडा जवळ त्यांचा अपघात झाला होता.

यावेळी सोनवणे यांच्या अमळनेर येथे कुटुंबियांना सात्वनपर भेटण्यासाठी धरणगाव येथील गृहनिर्माण संघटनेचे अध्यक्ष,अभियंता साहेब व सदस्यांनी भेट घेतली असता शुभम यांच्या आठवणींना उजाळा करुन देताना आई,वडील,बहीण,भाऊ यांच्या डोळ्यात दुःखद घटनेबाबत अश्रू आले.शुभमने केलेल्या कामाचा अनुभव खूपच वाखाणण्याजोगा होता,त्याने कर्मचारी व लोकांच्या मनात स्वतःचे वेगळं असं अस्तित्व निर्माण केलेले होतं.याप्रसंगी संघटनेच्या माध्यामातून ७५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.सदरील धनादेश जिल्हाध्यक्ष आकाश सैतवाल जामनेर,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता स्वप्नील शिसोदे,दिनेश भदाणे, तेजस वाघ,पूर्णानंद पवार,ललित पाटील, रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते शुभम सोनवणे यांच्या कुटुंबियांना आज रविवार रोजी धनादेश देण्यात आला.कंत्राटी कामगार मयत शुभम सोनवणे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यासह अन्य संघटना पदाधिकारी यांनी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला आहे.परंतु ,शासनाकडून अद्यापपावेतो कोणतीही मदत मिळाली नाही.तरी शासनाकडून लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम