राम लखनची जोडी पुन्हा पाहायला मिळणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २३ डिसेंबर २०२२ I कोणतीही इंडस्ट्री असो मात्र, प्रत्येक कलाकारची जय-वीरु सारखी दोस्ती पाहायला मिळते.
जसं की शाहरुख खान आणि सलमान खान शत्रुघ्न सिन्हा आणिअमिताभ बच्चन,यांच्या जोडीने चित्रपाटामध्ये तर धमाल केलीच त्याशिवया प्रेक्षकांनाही दोन धमाकेदार कलाकरांना एकत्र पाहाण्यास जास्त मजा आली. त्यांमुळे पुन्हा एकदा 80-90 च्या दशकातील धमाकेदारराम-लखनयांची जोडी म्हणजेच अभिनेताजॅकी श्रॉफआणिअनिल कपूरही जोडी पन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूडमधील सुपरस्टार अनिल कपूर (Anil Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) ही जोडी 21 वर्षापूर्वी ‘राम लखन’ (Ram Lakhan) या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्याशिवाय या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. यांनर जॉकी आणि अनिल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. हो दोघे बऱ्याच काळापसून एकत्र पाहायला मिळाले नाही. अशा परिस्थितीमध्ये या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांंध्ये चांगलाच क्रेज निर्माण झाला.

माध्यमातील वृत्तानुसार सुभाष घई (यांच्या दिग्दर्शनाखाली जॅकी आणि अनिल ही जोडी पुन्हा एकदा ‘चोर पुलिस’ या कॉमेडी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. याबाबत दोघांची चर्चा सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट कॉमेडी सोबतच चोराच्या कुटुंबातील परिस्थितिशी निगडीत दाखवणार आहेत. यामध्ये अनिल चोराच्या भूमिकेत असणार आणि जॅकी पोलिसांच्या कुटुंबात असणार आहे. या दोघांचा जबरदस्त अभिनय या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

वृत्तांच्या माहितीनुसार सुभाष घई आणि अनीस बज्मी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तसंच यचं दिग्दर्शन रवी जाधव करणायची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. चित्रपटाची कथा फायनल झाली आहे. या चित्रपटासाठी तरुण जोडीचा शोध सुरू असून, लोकप्रिय नायक-नायिकेला साईन करण्याची तयारी सुरू आहे.

अनिल आणि जॅकी यांनी शेवटी 2001 साली प्रदर्शित झालेला ‘लज्जा’ चित्रपटात एक काम केले होते. त्यापूर्वी या दोघांनी ‘राम लखन’, ‘कभी ना कभी’, ‘त्रिमूर्ती’, ‘अंदर बहार’, ‘काला बाजार’ आणि ‘शूटआउट अ‍ॅट वडाळा’ या गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये पाहिले गेले होते.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम