उर्फी जावेदचा अतरंगी फॅशन प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २४ डिसेंबर २०२२ I बिग बॉस फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदफॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही, तर अशक्य आहे.
उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने असाच काहीतरी अतरंगी लुक केला आहे. त्याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. नुकताच उर्फी जावेदने तिच्या अतरंगी फॅशन प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उर्फी जावेदचा हा नवीन व्हिडिओ बघून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण यावेळी तिने अतरंगी लुक केला आहे. उर्फीने यावेळी चक्क रिसायकल करायची नवीन पद्धत लोकांना सांगितली आहे. तिने या व्हिडिओमध्ये कोकाकोला कॅनच्या झाकणापासून टॉप बनवला आहे.


या व्हिडिओमध्ये तीने झाकणांचा टॉप परिधान केलेला असून त्याखाली काळ्या रंगाची जीन्स घातलेली आहे. या लुकमध्ये तिने लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्ते तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे. उर्फीने शेअर केलेले या व्हिडिओवर एक वापरकर्ता कमेंट करत म्हणाला की,”उर्फी तू खूप सुंदर आहे प्लीज स्वतःचे शरीर दाखवण्याचा प्रयत्न करू नको, तू साधारण कपड्यांमध्ये देखील सुंदर दिसशील.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”दीदी कृपया करून हे सगळं बंद करा आणि दुसऱ्या प्रकारचे रिल्स बनवा.” उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोक कमेंट करत आहे.

पण त्याचबरोबर दुसरीकडे उर्फीला ट्रोल देखील करण्यात आले आहे. नेटकरी उर्फीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे उर्फी देखील आता ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही. मस्त मोला स्टाईलमध्ये ती तिचे फॅशन एक्सपिरिमेंट सुरूच ठेवते आणि सोशल मीडियावर शेअर करत असते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम