अक्षय कुमारने लॉन्च केला स्वत:चा फॅशन ब्रँड

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ८ डिसेंबर २०२२ I एकापाठोपाठ एक सिनेमे करणारा बॉलिवूडचा ‘बिझी कुमार’ आता आपला फॅशन ब्रॅन्ड लॉन्च करतोय.

फोर्स 9 असं त्याच्या ब्रॅन्डचं नाव आहे. अक्षयने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, यानिमित्ताने पहिल्यांदा अक्षयने त्याच्या घराची झलक दाखवली आहे. पहिल्यांदा अक्षयने त्याच्या घरी मुलाखत दिली. याचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

मी पहिल्यांदा घरी इंटरव्ह्यू देतोय. आजपर्यंत मी घरी कधीच इंटरव्ह्यू दिलेला नाही, असं अक्षय या व्हिडीओत म्हणताना दिसतो. आपल्या फॅशन ब्रँडचं नाव फोर्स 9 का ठेवलं? याचं उत्तरही तो या व्हिडीओत देतो. ब्रह्मांडाला कंट्रोल करणारा सर्वात मोठा फोर्स असतो. दुसरा फोर्स आहे मदर नेचर. तिसरा आपला आर्म्ड फोर्स. माझे वडिल आर्मीत होते म्हणून मला त्याबद्दल अपार आदर आहे. माझा लकी नंबर 9 आहे. माझा वाढदिवसही 9 तारखेला असतो. या दोन्ही गोष्टी मिक्स करून मी फोर्स 9 हे नाव दिलं आहे, असं अक्षय सांगतो.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम