उर्फी जावेदचा आणखी एक हटके अंदाज

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १० डिसेंबर २०२२ I बिग बॉस फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे.उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांना चकित करून सोडते. उर्फीने असाच काहीतरी अतरंगी लुक केला आहे. त्याचा कुणालाही अंदाज लावता येणार नाही. यावेळी उर्फेने चक्क सायकलमध्ये असणाऱ्या चेन पासून ड्रेस तयार करून, तो परिधान केला आहे.

 

इंटरनेट सन्सेशन उर्फी जावेद फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर आता अशक्य झाले आहे. उर्फीने सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची फॅशन बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी सुरुवातीला सायकल चालवताना दिसत आहे. सायकल चालवत असताना उर्फीच्या सायकलीची चेन गळून पडते. साधारण चेन गळून पडल्यावर आपण ती दुरुस्त करून पुन्हा सायकल चालवायला लागतो. मात्र, उर्फीने ती चेन काढून चक्क तिला ड्रेस म्हणून परिधान केले आहे. उर्फीने या चेन पासून टॉप आणि स्कर्ट बनवून परिधान केला आहे.

उर्फीने नुकताच शेअर केलेल्या या लुक मध्ये तिने सायकलच्या चेन पासून टॉप, स्कर्ट आणि ब्रेसलेट तयार केले आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने केस मोकळे सोडलेले असून ब्लॅक कलरची हिल्स परिधान केलेली आहे. उर्फीचा हा लुक बघून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे. त्याचबरोबर उर्फीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.उर्फीच्या या पोस्टवर नेटकरी संमिश्र कमेंट करत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम