अथिया-केएल राहुल अडकणार यादिवशी विवाह बंधनात
मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
परंतु या सगळ्या अफवा असल्याचं त्या दोघांनी सांगितलं होतं.
आता पुन्हा एकदा केएल राहुल-अथिया लग्नगाठ बांधणार आहे, अशा चर्चा आहेत. पण यावेळी ही माहिती दोघांच्या जवळच्या सूत्रानं दिली आहे. या सूत्रानं या दोघांच्या लग्नाची तारीखही सांगतिली आहे.
सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 23 जानेवारी दरम्यान दोघं थाटामाटात लग्न करणार आहेत. हा लग्नसोहळ्याचा कार्यक्रम तीन-चार दिवस चालणार आहे. यामध्ये मेहंदी,हळद, संगीताचे कार्यक्रमही होणार आहेत.
या दोघांचं लग्न पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीनं होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे लग्न सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील ‘जहान’ या बंगल्यावर धुमधडाक्यात होणार आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम